शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलावर आता १७ जूनला होणार कारवाई!

By admin | Updated: June 13, 2014 02:58 IST

वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर आता १७ जून रोजी कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई : वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर आता १७ जून रोजी कारवाई करण्यात येणार आहे. तत्पूर्वी १३ आणि १४ जून रोजी येथील रहिवाशांना कारवाई करण्यात येणार असल्याची आगाऊ सूचना म्हणून पालिकेतर्फे नोटीस धाडण्यात येणार आहे.मुंबई महापालिका प्रशासनाने येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासह घराच्या चाव्या सुपुर्द करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. ही मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. दरम्यानच्या काळात रहिवाशांनी घरे रिकामी केली. मात्र घराच्या चाव्या अद्याप काही पालिकेला सुपुर्द केलेल्या नाहीत. यावर अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी म्हणाले, शुक्रवार आणि शनिवारी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना कारवाई करणार असल्याची आगाऊ सूचना म्हणून नोटीस धाडण्यात येईल. त्यानंतर १७ जून रोजी प्रत्यक्षात येथील कारवाईला सुरुवात होईल. या कारवाई अंतर्गत इमारतीमधील बेकायदा मजल्यांची वीज आणि पाणी कापले जाईल.दरम्यान, कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये रहिवाशांनी ठोकलेल्या तंबूलादेखील पालिकेने नोटीस बजावली आहे. या कारवाई अंतर्गत हा तंबूही उखडला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅम्पा कोलावरील कारवाईसाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या होत्या. मात्र अद्याप एकाही कंत्राटदाराने निविदा प्रक्रियेत रस दाखविलेला नाही. परिणामी निविदा प्रक्रियेस विलंब झाला तरी आता कारवाई थांबणार नाही, असेही अडताणी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)