मंत्रिमंडळ बैठक: अवकाळी पाऊस नुकसान भरपाई, झोपू योजनेसह ८ महत्वाचे निर्णय; वाचा एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:34 PM2023-11-29T16:34:02+5:302023-11-29T16:34:21+5:30

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले होते. या महत्वाच्या प्रश्नावरही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. 

Cabinet meeting: 8 important decisions including unseasonal rain compensation, Zopu Yojana; Read in one click... | मंत्रिमंडळ बैठक: अवकाळी पाऊस नुकसान भरपाई, झोपू योजनेसह ८ महत्वाचे निर्णय; वाचा एका क्लिकवर...

मंत्रिमंडळ बैठक: अवकाळी पाऊस नुकसान भरपाई, झोपू योजनेसह ८ महत्वाचे निर्णय; वाचा एका क्लिकवर...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अवकाळी पावसाने राज्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले होते. या महत्वाच्या प्रश्नावरही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे....

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. 
  • झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. 
  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. 
  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्यात येणार आहे. 
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली आहे. 
  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित  सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. 
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे. 
  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. 

Web Title: Cabinet meeting: 8 important decisions including unseasonal rain compensation, Zopu Yojana; Read in one click...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.