मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 15:13 IST2023-10-13T15:12:47+5:302023-10-13T15:13:26+5:30

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी कायम ठेवला. 

Cabinet expansion is in the hands of the Chief Minister says Ajit Pawar | मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

भातसानगर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरवतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी त्या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी कायम ठेवला. 

दशरथ तिवरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी आमदार दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दरोडा यांच्याशी बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा केली. नंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, लवकरच शहापूर तालुक्यातील चोंढे, घाटघर, नगर या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

या रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपमुख्यमंत्र्यांसमवेत राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, किसन तारमळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे, शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊ दरोडा, करन दरोडा आदी पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Cabinet expansion is in the hands of the Chief Minister says Ajit Pawar