शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

कोराडी येथे 2 बाय 660 मेगावॉट वीज निर्मिती नवीन संच उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 9:21 PM

दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला

मुंबई/नागपूर -  दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली.

वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून 20 टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही आज मान्यता देण्यात आली. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेच्या सर्वाधिक मागणी 25 हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच 19 व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी 20363 मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक  मागणीची नोंद यंदा झाली आहे.

आज महाराष्ट्र विजेच्या क्षेत्रात परिपूर्ण झाला असल्यामुळेच राज्य भारनियमन मुक्त झाले आहे. आगामी काळातही महाराष्ट्रृात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये व जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशानेच ऊर्जा विभागाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात  हा प्रस्ताव शासनासमोर सादर केला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.  

महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन 2023-24 मध्ये 27000 पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन 2023-24 साठ़ीचा 25 हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता 2019 मेगावॅट विजेची तूट भासू शकते.

 महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता 13602 मेगावॉट असून त्यापैकी 10170 मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी  महानिर्मितीचे 1680 मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता 2 बाय 660 मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक 1 ते 4 बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.या प्रकल्पात संच क्रमांक 1 काम पूर्ण होण्यासाठी 45 महिने व संच क्रमांक 2 पूर्ण होण्यासाठी 51 महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 80 टक्के रकक्म कर्ज रुपाने तर 20 टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.

संच क्रमांक 6 चे नूतनीकरण

जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक 6 चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 486 कोटी व महाराष्ट्र शासनाकडून 96 कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास 563.12 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार