शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘बिझनेस आयकॉन्स’ विकासाचे सारथी

By admin | Updated: December 22, 2014 03:02 IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण

नागपूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या नागपुरातील खऱ्या ‘आयकॉन्स’चा शोध घेऊन त्यांच्या यशाची गाथा ‘लोकमत’ने जगासमोर आणली. ही वृत्तपत्र क्षेत्रातील क्रांतिकारक घटना आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व ‘जेएसडब्ल्यू ग्रुप’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांनी काढले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी एका शानदार समारंभात नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे झालेल्या या कार्यक्रमात सज्जन जिंदल यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरकरांना अभिमान वाटावा अशी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ५४ ‘बिझनेस आयकॉन्स’च्या उत्तुंग यशाची गाथा या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा होते. समारंभाच्या सुरुवातीला ‘लोकमत’ समूहाच्या वाटचालीविषयीचा लघुपट सादर करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. यानंतर गडकरी व जिंदल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. देशातील प्रत्येक शहरात असा उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत जिंदल यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या शानदार समारंभाची सांगता झाली. लोकमत नागपूरचे युनिट हेड नीलेशसिंह यांनी मान्यवरांचे स्वागत केले. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र हेदेखील मंचावर उपस्थित होते. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)