एचपी कंपनीला ग्राहक मंचचा दणका

By Admin | Updated: September 3, 2015 00:52 IST2015-09-03T00:52:14+5:302015-09-03T00:52:14+5:30

नेरूळ येथील एका ग्राहकाला सदोष लॅपटॉप दिल्याप्रकरणी नवी मुंबई ग्राहक न्यायालयाने एचपी कंपनीला दणका दिला आहे. एचपीने संबंधित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून लॅपटॉपची किंमत

A bump of a customer platform to HP Company | एचपी कंपनीला ग्राहक मंचचा दणका

एचपी कंपनीला ग्राहक मंचचा दणका

नवी मुंबई : नेरूळ येथील एका ग्राहकाला सदोष लॅपटॉप दिल्याप्रकरणी नवी मुंबई ग्राहक न्यायालयाने एचपी कंपनीला दणका दिला आहे. एचपीने संबंधित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून लॅपटॉपची किंमत, न्यायालयीन खर्च व लॅपटॉपमधील डाटा गहाळ झाल्याप्रकरणी एकूण सव्वा तीन लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार विशाल भालोदिया यांनी नोव्हेंबर २००७ मध्ये एचपीचा ३० हजार रुपयांमध्ये लॅपटॉप तीन वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी केला होता. एप्रिल २०१० मध्ये विशाल आपल्या कंपनीच्या कामानिमित्त चंदिगड येथे आपल्या लॅपटॉपमधून उपस्थित ६० अधिकाऱ्यांना प्रेझेन्टेशन दाखवित असताना लॅपटॉपमधून धूर आला. त्यामुळे त्यांनी लॅपटॉप बाजूला टाकताच तीन स्फोट होवून आग लागली. विशाल यांनी या सर्व घटनेचे आपल्या मोबाइलद्वारे चित्रीकरण करून त्याची सीडी तयार केली. त्यानंतर एचपीकडे ही सीडी पाठवून तक्रार केली होती. आधी कंपनीने मे २०१० मध्ये दुसरा लॅपटॉप दिला होता. परंतु महत्त्वाची माहिती नष्ट झाल्याने त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: A bump of a customer platform to HP Company