अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकारची कसोटी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 06:47 IST2020-02-24T04:00:19+5:302020-02-24T06:47:16+5:30
महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपने केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकारची कसोटी लागणार
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सोमवारपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात आहे. महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे हल्ले परतवण्याची जोरदार तयारी सरकारने केली असून तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत त्यासाठीची रणनीती निश्चित करण्यात आली.