शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणला ब्रिटिशकालीन कंपनीचा खोडा; महसूल मंत्र्यांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 1:16 PM

मीरा भाईंदर मधील गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या मानीव अभिहस्तांतरणसाठी ब्रिटिशकालीन कंपनी नागरिकांची अडवणूक करत मनमानी पैसे उकळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धीरज परब / मीरा रोड - मीरा भाईंदर मधील गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीच्या मानीव अभिहस्तांतरणसाठी ब्रिटिशकालीन कंपनी नागरिकांची अडवणूक करत मनमानी पैसे उकळत आहे. या मुळे इमारतीच्या जमिनी राहिवाश्यांच्या मालकीच्या झाल्या नसून हजारो कुटुंब संकटात सापडली आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या ब्रिटिशकालीन गुलामगिरीच्या जोखडातून सोडवा असे साकडे मीरा-भाईंदर हाऊसिंग फेडरेशन ने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून घातले आहे. 

स्वतंत्र भारतात मीरा भाईंदर हे एकमेव असे शहर आहे की येथील जमिनींवर आजही ब्रिटिश कालीन कंपनी हक्क सांगत आहे.   समुद्र व खाडीचे पाणी शेतात शिरू नये म्हणून ब्रिटिश काळात बांधबंदिस्ती ची जबाबदार रामचंद्र लक्ष्मण यांना दिली होती. नंतर त्याचे अधिकार इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने मिळवले. वास्तविक बांधबंदिस्तीच्या मोबदल्यात पिकाचा काही भाग शेतकऱ्यांनी द्यायचा होता. परंतु बांधबंदिस्ती केली गेली नाही व शेती सुद्धा आता पिकवली जात नाही. पण कंपनीने पिकाचा खंड घेण्या ऐवजी जमीनींवरच हक्क दाखल करून लगान वसुली चालवल्याचा आरोप सातत्याने होत आहे. 

जेणेकरून बांधकाम परवानगी घेण्या पासून शहरातील गृहनिर्माण संस्थांना इमारतीच्या जमिनींचे मानीव अभिहस्तांतरण करून घेण्यासाठी ह्या ब्रिटिश कालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीला मागेल त्याप्रमाणे जिझिया कर भरावा लागत आहे. 

मीरा भाईंदर शहरामध्ये जवळपास  सहा हजार गृहनिर्माण संस्था आहेत पण आजतागायत किमान पाच टक्के गृहनिर्माण संस्थाचे सुद्धा डीम कन्व्हेन्स झालेला नाही.  कारण इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीची नाहरकत आणण्याची जाचक मागणी संबंधित सरकारी कार्यालयातून केली जाते. सदर कंपनी नाहरकत साठी वाट्टेल तेवढी अवास्तव रक्कम मागते. गृहनिर्माण संस्था मधील राहिवाश्यांना इतकी मोठी रक्कम भरणे शक्य होत नसल्याने  डीम कन्व्हेयन्स ची प्रक्रिया पूर्ण होत नाही. जेणेकरून राहिवाश्यांना इमारतीच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत नसल्याने पुनर्विकासाचा मार्ग खुंटला असून हजारो कुटुंब न्याय हक्का पासून वंचित आहेत.  याबाबत महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू , मीरा-भाईंदर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण मधील सर्वात मोठ्या अडथळ्या बाबतची माहिती दिली.  इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या जाचातून नागरिकांना सोडवा असे साकडे घातले. यावेळी या प्रश्नावर सकारात्मक विचार करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्री यांनी दिले आहे. 

इमारत बांधते वेळी विकासकां कडून मोठी रक्कम घेऊन कंपनी नाहरकत देते. व आता त्याच इमारतीतील राहिवाश्यां कडून जमीन अभिहस्तांतरण साठी पुन्हा मनमानी पैसे उकळून लूट चालवल्याचा आरोप  पाटील यांनी केला आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक