शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर एएसआय व दोन हेड कॉन्स्टेबल गजाआड

By admin | Updated: July 25, 2014 00:51 IST

रेल्वे पोलिस ठाण्यातील प्रकार

अकोला : जीआरपी अर्थात रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या आरोपीस सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याच्याकडून ५00 रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह (एएसआय) दोन पोलिस हेड कॉन्स्टेबल्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहात अटक केली. या त्रिकुटाने आरोपीकडून यापूर्वीही २0 हजार रुपयांची लाच घेतली असल्याची माहिती एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिली. जीआरपीमध्ये महेश करोडदे याला एका गुन्हय़ामध्ये अटक केली होती. या आरोपीला मारहाण न करणे, तसेच त्याला विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जीआरपीचे एएसआय शेख अनवर शेख अली, पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई आणि इरफान अजीजखान पठाण यांनी १0 हजार रुपयांची लाच मागितली होती. महेश करोडदे याने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. एसीबीने सापळा रचला आणि लाच दोन ते तीन टप्प्यात देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार २४ जुलै रोजी महेश करोडदे हा एएसआय शेख अनवर शेख अली याला ५00 रुपयांची लाच देताना एसीबीने छापा मारून त्याला अटक केली. यात पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई आणि इरफान अजीजखान पठाण हेदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.