Breaking: Finally, transfer orders released by Maharashtra Government of officers | Breaking: अखेर मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले

Breaking: अखेर मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्यासरकारने अखेर आज अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. 

 

 • सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची अखेर मुंबई येथे पदोन्नतीवर माहिती महासंचालक या पदावर बदली झाली आहे. 
 • सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली झाली असून मिलिंद शंभरकर हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत. 
 • जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई.
 • एस ए तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली  प्रधान सचिव वस्त्रोद्योग
 • डॉ. के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
 • बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने
 • राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास
 • संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई
 • श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे
 • प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे
 • असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा
 • दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली
 • शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई
 • शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा
 • पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका

Web Title: Breaking: Finally, transfer orders released by Maharashtra Government of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.