दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण ‘या’ ३ अटींवरच; अजितदादांच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:03 IST2026-02-04T14:58:03+5:302026-02-04T15:03:54+5:30

NCP Merger News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

both ncp party will come together but only on these 3 conditions ajit pawar leaders dharmarao baba atram clearly stated | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण ‘या’ ३ अटींवरच; अजितदादांच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण ‘या’ ३ अटींवरच; अजितदादांच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले

NCP Merger News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या गटातील विलीनीकरणाबाबत तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्याचे समोर आले आहे. 

अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया थांबल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. याबाबत अजित पवार, जयंत पाटील यांच्यात चार महिने चर्चा सुरू होती. परंतु, यात आता खंड पडल्याचेही शरद पवारांनी म्हटले होते. राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुख्य मुद्दा आहे. मी वारंवार विचारतोय कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे. पण दुर्दैवाने त्यावर कुणी बोलत नाही. एकबाब म्हणजे ही चर्चा कुठल्या टप्प्यावर कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. जो व्हिडिओ फिरवला जातोय, त्यानंतर अजितदादांचा मला फोन आला होता असे सांगत सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावरून मोठा दावा केला. यानंतर आता विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी तीन अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पुढे चर्चा होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण ‘या’ ३ अटींवरच

अजित पवार कधीही दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत आमच्याशी बोलले नाही, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. विलीनीकरणाची १२ तारीख ठरली नव्हती. तारीख ठरली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितले असते. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत याचचे आहे. त्यांना एनडीएसोबत यावे लागेल, असे आत्राम यांनी म्हटले आहे. 

धर्मराव बाबा आत्राम यांनी कोणत्या तीन अटी ठेवल्या आहेत?

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांपैकी आमच्या पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांना आम्ही निवडले आहे. आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल, हे आम्ही नंतर ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल.

- आम्हाला एनडीए सोबत राहायचे आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. या चिन्हाखाली त्यांनी एकत्र यावे आणि शरद पवार गटाने घडाळ्याचा स्वीकार करून एकत्र यावे. सुनेत्रा अजित पवार आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर एनडीएसोबत राहणे गरजेचे आहे. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही.

 

Web Title : एनसीपी विलय इन तीन शर्तों पर निर्भर, अजित पवार गुट का कहना है।

Web Summary : राजनीतिक बदलाव के बाद एनसीपी गुटों के बीच विलय की चर्चा फिर से शुरू हो गई है। अजित पवार समूह ने तीन शर्तें रखी हैं: सुनेत्रा पवार को नेता के रूप में स्वीकार करना, एनडीए के साथ रहना और घड़ी के प्रतीक का उपयोग करना। भविष्य की चर्चा इन शर्तों पर सहमत होने पर निर्भर करती है।

Web Title : NCP merger hinges on these three conditions, says Ajit Pawar's faction.

Web Summary : Merger talks between NCP factions resurface after political shifts. Ajit Pawar's group proposes three conditions: accepting Sunetra Pawar as leader, staying with NDA, and using the clock symbol. Future discussions depend on agreeing to these terms.