चापोली, जि. लातूर : अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथे गुरुवारी अपहरण झालेल्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी उमरगा कार्ट शिवारातील वनीकरण विभागाच्या वनराईत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा अत्याचार करून खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.तेलगाव येथील अविनाश मंदाडे यांच्या शेतात सालगडी म्हणून बबन खोकले काम करत होते. गुरुवारी बबन खोकले यांच्यावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला करून त्यांच्या पत्नीचे अपहरण केले. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बबन खोकले यांच्यावर लातुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}