शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबीयांवर ठपका!

By admin | Updated: March 24, 2015 02:38 IST

विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा : ‘ईडी’ला आढळले आरोपांत तथ्यडिप्पी वांकाणी - मुंबईनवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीच्या कामातील कथित घोटाळ््याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे.आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील माजी निमंत्रक अंजली दमानिया यांनी केलेल्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने ‘ईडी’ व महाराष्ट्र सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांचे एकत्रित तपासी पथक नेमून तपास करण्याचा व या तपासाचा अंतरिम अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ‘ईडी’ने सीलबंद लखोट्यात न्यायालयात सादर केलेल्या तपासी अहवालात भुजबळ कुटुंबीयांवर ठपका ठेवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.भेटायला तुरुंगात जावे लागेल!न्यायालयात याप्रकरणी उद्या, मंगळवारी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी व्हायची असून, न्यायालय पुढे काय निर्देश देते याविषयी उत्सुकता आहे. या संदर्भात ‘भुजबळांना भेटायला आता तुरुंगात जावे लागेल!’ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात केलेले विधान सूचक मानले जात आहे.आडमार्गाने पैसे घेतल्याचे उघड‘ईडी’च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की महाराष्ट्र सदनाचे काम मिळविण्यास भुजबळ यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपन्यांना आडमार्गाने लाच म्हणून पैसे देण्यात आल्याचे जनहित याचिकेतील आरोपांत काही अंशी तथ्य असल्याचे तपासात आढळले असून, आम्ही तसा अहवाल न्यायालयास दिला आहे. भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदनाचे कंत्राट दिले होते. हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असल्याने नाव उघड करण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचे संचालक राजेश माधव धरप यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला.अधिकारी म्हणतात...च्भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर प्रवेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे संचालक होते. त्यांनी ६५ कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीचे प्रत्येकी १०० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स ९,९०० रुपयांच्या आधिक्याने (प्रीमियम) विकले होते. च्पंकज व समीर हे आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीचेही संचालक आहेत. हे दोघे ६० कोटी रुपयांचा समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. च्महाराष्ट्र सदनाचे काम ज्यांना मिळाले होते, त्यांनी दिलेले पैसे प्रवेश कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर बनावट कंपन्यांनी विकत घेतल्याचे दाखवून आर्मस्ट्राँग कंपनीत वळविले गेले होते, असा आम्हाला संशय आहे.