पडळकरांना पुढं करून भाजपचा जाणकरांना शह !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:46 PM2019-09-30T17:46:35+5:302019-09-30T17:48:27+5:30

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून संधी देण्यात येणार आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बारामती मतदार संघातून जाणकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता बारामती विधानसभा मतदार संघातून पडळकर निवडणूक लढवणार आहे.

BJP's given space to Padalkar for substitute of Mahadev Jankar | पडळकरांना पुढं करून भाजपचा जाणकरांना शह !

पडळकरांना पुढं करून भाजपचा जाणकरांना शह !

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - वंचित बहुजन आघाडीत असताना आधी शेतकरी कामगार पक्षात चाचपणी केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सत्तेत दाखल होण्यासाठी प्रयत्नशील असलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने देखील पडळकरांना सामील करून धनगर मतांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर यांच्यावर निर्भर न राहता योजना केली आहे. त्यामुळे पडळकरांचा भाजपमधील प्रवेश जाणकरांना एकप्रकारे शहच मानला जात आहे.

युतीची बोलणी जवळजवळ निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेना 122 आणि भाजप 166 असं सुत्र ठरलं आहे. परंतु, मित्र पक्षांना काय यावर ठोस भूमिका घेतली नाही. युतीत बीड विधानसभा मतदार संघातून विनायक मेटे यांचे नाव कापण्यात आले असून सेनेचे जयदत्त क्षीरसागर येथून निवडणूक लढवणार आहे. त्याआधी युतीने उदयनराजे भोसलेंना पक्षात घेऊन मराठा मतांची व्यवस्था केली. आता जाणकरांच्या बाबतीतही तसच होत आहे.

महादेव जाणकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच ते मंत्रीही होते. त्यानुसार त्यांना आता युतीकडे 20 हून अधिक जागांची मागणी केली आहे. परंतु, भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडळकरांना पक्षात घेऊन धनगर समाजाच्या मतांची व्यवस्था केली आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजात प्रसिद्ध आहे. धनगर युवक मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षीत झालेले आहे. त्यामुळे मेटेंप्रमाणेच जाणकरांना देखील या निवडणुकीत मित्र पक्ष असल्याचा फारसा लाभ होईल, अशी शक्यता दिसत नाही.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून संधी देण्यात येणार आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बारामती मतदार संघातून जाणकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता बारामती विधानसभा मतदार संघातून पडळकर निवडणूक लढवणार आहे.

 

Web Title: BJP's given space to Padalkar for substitute of Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.