शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आंदोलन सेनेने हाणले

By admin | Updated: September 15, 2016 02:22 IST

दिव्यातील रस्त्यांची दुरवस्था व अन्य नागरी समस्या सोडवण्याकरिता लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांना सुबुद्धी मिळावी

ठाणे : दिव्यातील रस्त्यांची दुरवस्था व अन्य नागरी समस्या सोडवण्याकरिता लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांना सुबुद्धी मिळावी, याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करण्याकरिता निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना शिवसेनेने पोलिसांवर दबाव टाकून रोखल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तरीही, गनिमी काव्याने काही कार्यकर्ते मुख्यालयापाशी पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन हाणून पाडले. दिव्यातील भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी गणेशपूजन करू न दिल्याने दिवावासीय संतप्त झाले आहेत. शिवसेना आणि पालिका प्रशासनाने आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे आंदोलन चिरडल्याचा आरोप मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि या समस्या सोडवण्याची बुद्धी पालिका प्रशासन व स्थानिक आमदार, नगरसेवक यांना मिळावी, या उद्देशाने दिवा मंडळाचे भाजपाचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजन करून श्री गणेशाला दिवा विकासाचे गाऱ्हाणे घालण्याचे निश्चित केले असल्याचे पोलीस, पालिका प्रशासन यांना लेखी पत्राद्वारे कळवले होते.पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने या गाऱ्हाण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिवावासीय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर गणेशपूजनासाठी निघाले असताना पोलिसांनी दिवावासीयांच्या गाड्या दिव्यात अडवून ठेवल्या. गणेशपूजनासाठी नेण्यात येणारी मूर्ती मुंब्रा पोलिसांनी कार्यकर्त्यांसह खारेगाव येथे ताब्यात घेतली. तरीही, मुंडे व निवडक १० ते १२ कार्यकर्ते गनिमी काव्याने पालिका मुख्यालयासमोर पोहोचले. गणेशपूजन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गणेशपूजनाचा कार्यक्रम हाणून पाडला.याबाबत, मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यांच्या भयानक स्थितीबाबत आम्ही वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिव्यातील रस्ते व खड्डे याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबतचे पत्रही आम्ही महापौर व प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रशासन दिवावासीयांना गांभीर्याने घेत नसल्याची स्थानिकांची भावना आहे. दिव्याच्या पायाभूत सुविधांसाठी कोणतीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी पालकमंत्री आणि स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.