शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Shiv Sena MP Sanjay Raut: "भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 3:44 PM

Shiv Sena MP Sanjay Raut: महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई : दोन दिवसापूर्वी बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्यानंतर याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. 

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. "महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या.", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, संजय राऊत आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपाला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. ''बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!'', असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे.

मुंबई अभी बाकी है – चंद्रकांत पाटीलसोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केले जात आहे की, बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटले होते. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हटले की, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असे थेट आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. तसेच, बेळगावात भाजपाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेनाbelgaonबेळगाव