BJP should give explanation about Arnav Goswamis WhatsApp chat Congress demands | अर्णव गोस्वामींच्या WhatsApp चॅटबद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावं; काँग्रेसची मागणी

अर्णव गोस्वामींच्या WhatsApp चॅटबद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावं; काँग्रेसची मागणी

ठळक मुद्देअर्णब गोस्वामी यांचं व्हॉट्सअॅप चॅट झालं होतं व्हायरलटीआरपी घोटाळ्यात भाजपाचा हात, काग्रेसचा आरोप

"समाजमाध्यमंध्ये BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे WhatsApp वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 
"मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर BARC चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. सदर टीआरपी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला असून त्याकरता उत्तर प्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकारदेखील घडला. हा सगळा आटापिटा आपलं कारस्थान उघड पडेल या हेतून होता, हे चॅट वरून दिसून येत आहे," असं सावंत यावेळी म्हणाले. 

"सदर चॅट्स मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपला पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि AS यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या टीआरपी मध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. यामध्ये AS नावाची व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवण्यात आली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट आहे," असंही ते म्हणाले.

केंद्राचा संबंध काय? 

या कालावधीमध्ये प्रेक्षकांची गोपनीय स्वरुपाची माहिती उघड करण्यात आली, हे ही दिसून येते. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. टीआरपी घोटाळ्यामध्ये केंद्र सरकारचा काय संबंध आहे? किरीट सोमय्या व राम कदमांसहित भाजपाचे नेते रिपब्लिक चॅनेलच्या प्रमुखाच्या पाठीशी का उभे राहिले? आणि या कारस्थानामध्ये भाजपची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी पोहचतीलाच अशी अपेक्षा यावेळी सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP should give explanation about Arnav Goswamis WhatsApp chat Congress demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.