शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे साबळे राज्यसभेवर बिनविरोध

By admin | Updated: March 11, 2015 02:39 IST

राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक असताना पिंपरी चिंचवड येथील भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष

मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक असताना पिंपरी चिंचवड येथील भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अमर शंकर साबळे यांची अनपेक्षितपणे वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत मुरली देवरा यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपाकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, मुंबईतील नेत्या शायना एन.सी. यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी चर्चा होती; पण अचानक साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साबळे हे पूर्वीपासून ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. २००९मध्ये ते स्वत: पिंपरीमधून (जि. पुणे) विधानसभेची निवडणूक लढले, पण त्यांना हार पत्करावी लागली होती. २००४च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीची जागा भाजपाने रिपाइंसाठी सोडल्याने साबळे यांनी निवडणूक लढविली नव्हती. आता राज्यसभेचे तिकीट देऊन पक्षाने त्याची भरपाई केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. साबळे यांना आजच उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. या जागेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)