शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय सवरांविरुद्ध भाजपातूनच रसद!

By admin | Updated: September 17, 2016 03:41 IST

आदिवासी विकासमंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडण्यात यश न आलेले भाजपाचे विष्णू सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यामागे पक्षातीलच काही आदिवासी आमदार असल्याचे बोलले जात आहे.

यदु जोशी ल्ल मुंबई
आदिवासी विकासमंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडण्यात यश न आलेले भाजपाचे विष्णू सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यामागे पक्षातीलच काही आदिवासी आमदार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: सवरांच्या जागी आपल्याला मंत्रिपद मिळेल, ही आशा असलेले काही नेते सवरांच्या विरोधाला रसद पुरवत असल्याचीही चर्चा आहे.
दीर्घकाळ आमदार असलेले सवरा स्वत: आदिवासी आहेत आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्याचे नेतृत्व करतात. ते तेथील पालकमंत्रीदेखील आहेत. या जिल्ह्यात कुपोषणाने बालके दगावत असताना सवरा तिकडे फिरकले नाहीत. त्यातच, ‘आदिवासी मेले तर मरू देत’, असे त्यांनी न म्हटलेले वाक्य त्यांच्या तोंडी टाकून राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठविली आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्येच असलेले आणि आताही त्या पक्षात चांगले संबंध असलेले आणि आता भाजपाचे आमदार असलेले एक नेते आपल्या जुन्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचे चित्रही समोर आले आहे.
सवरा यांना मंत्रिपदावरून हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी समाजातील काही लोकांकडून पत्र पाठविणे, भाजपाच्या आदिवासी आमदारांचा एक दबावगट तयार करणे, त्यांच्या गुप्त बैठकी घेणे अशा जोरदार हालचाली काही महिन्यांपासून सुरू आहेत. गेल्या विस्ताराअगोदर ‘सवरांना हटविणार’ या बातम्या पेरण्याचे कामदेखील झाले होते.सवरा हटाव मोहिमेसाठी अर्थात ते स्वत:देखील जबाबदार आहेत. शासकीय आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना सवरा मंत्री झाल्यापासून शालेय साहित्य, स्वेटर, गणवेश यातील काहीही वेळेत मिळालेले नाही. कंत्राटदारांचे आपसातील वाद, अधिकाऱ्यांचे वैयक्तिक हित यात आदिवासी विकास खात्याचा पार बोजवारा उडाला आहे. सवरा यांनी आपल्या मंत्री कार्यालयात नेमलेल्या पीए, पीएस यांच्या ‘कर्तृत्वा’बद्दल नेहमीच चर्चा असते.
विभागातर्फे दरवर्षी आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान केले जातात. गेली दोन वर्षे हे पुरस्कारच देण्यात आलेले नाहीत. विभागाच्या २९ आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये प्रत्येकी एक आढावा समिती स्थापन केली जाते. त्यात स्थानिक प्रतिष्ठितांचा समावेश असतो. अशा समित्याच सवरांच्या कार्यकाळात अद्याप झालेल्या नाहीत. शेकडो आश्रमशाळांमधील जेवण, राहण्याच्या सुविधा, पुरविण्यात येणाऱ्या वस्तू यातील दर्जामध्ये काहीही फरक पडलेला नाही.