भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूरच्या दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 14:18 IST2019-01-06T14:16:20+5:302019-01-06T14:18:19+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा  दुपारी ४ वाजता लातुरात दाखल होतील. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यासोबत सायंकाळी बैठक होईल.

BJP President Amit Shah today visited Latur | भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूरच्या दौऱ्यावर

भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूरच्या दौऱ्यावर

ठळक मुद्देभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा आज लातूर दौऱ्यावर येत आहेत लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यासोबत सायंकाळी बैठक होईल

लातूर  - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा आज लातूर दौऱ्यावर येत आहेत.  दुपारी ४ वाजता ते लातुरात दाखल होतील. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यासोबत सायंकाळी बैठक होईल. सदर बैठकीस निमंत्रितांनाच प्रवेश आहे.  पत्रकारांनाही प्रवेश नाही.

सायंकाळी ७.३० वाजता शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद आहे, तिथे मात्र निमंत्रिताबरोबर पत्रकारांना प्रवेश खुला आहे. दरम्यान सायंकाळच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हेही मार्गदर्शन करणार आहेत.  यावेळी चार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

Web Title: BJP President Amit Shah today visited Latur