50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 07:48 PM2019-11-01T19:48:57+5:302019-11-01T19:56:38+5:30

भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.

BJP prepares for oath-taking ceremony of government ; Booked the stadium too | 50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

Next

मुंबई - भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाचे समसमान वाटप यावर शिवसेने आग्रह धरल्याने भाजपा आणि शिवसेनेमधील सत्तास्थापनेबाबतची चर्चा  थांबली आहे. मात्र असे असले तरी भाजपाने मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आणि नव्या सरकारच्या शपथविधीसाठी तयारी सुरू केली आहे.  नव्या सरकारच्या शपथविधीसाठी  5 नोव्हेंबरची तारीख निश्चित करत भाजपाने वानखेडे स्टेडियम बूक केले आहे. आता बीसीसीआयच्या परवानगीनंतर भाजपाला शपथविधीसाठी स्टेडियम मिळणार आहे. 

दरम्यान, मुंबई पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली. त्याआधी सरकारच्या शपथविधीसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची निवड कऱण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या अहवालानंतर हे ठिकाण बदलण्यात आले.  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच भाजपा आणि शिवसेना महाआघाडील स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना राज्यात सत्तास्थानांचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत दिलेले आश्वासन भाजपाने पाळावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. एकीकडे भाजपाने दिलेले आश्वासन पाळावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह कुठलेही महत्त्वाचे खाते शिवसेनेस देण्यास तयार नाही.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या असून, शिवसेनेला 7 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 

Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी

Web Title: BJP prepares for oath-taking ceremony of government ; Booked the stadium too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.