Jharkhand Legislative Assembly elections to be held in five phases from 30 November | झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमधून झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. झारखंडमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. 30 नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा,  7 डिसेंबर रोजी दुसरा टप्पा, 12 डिसेंबर रोजी तिसरा टप्पा, 16 डिसेंबर रोजी चौथा टप्पा आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान  होईल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.''  

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील. 

झारखंड विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजपा - 49 

एजेएसयू - 3 

झारखंड मुक्ती मोर्चा - 17

 काँग्रेस - 5

जेव्हीएम (पी) -1

सीपीआय (एमएल) -1 

बीएसपी - 1

एमससी -1 

Web Title: Jharkhand Legislative Assembly elections to be held in five phases from 30 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.