उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:42 PM2019-08-24T14:42:52+5:302019-08-24T14:43:23+5:30

ल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावरून उदयनराजे लवकरच भाजपवासी होणार असंच दिसत आहे.

BJP people want Udayan Rajan; Don't think supporters! | उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

googlenewsNext

मुंबई - भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी करणाऱ्या नेत्यांमध्ये साताऱ्याचे डॅशिंग खासदार छत्रपती उदयनराजे यांचं नावही सामील होण्याची शक्यता आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर उदयनराजे यांनी देखील लवकरच निर्णय घेईल, असा सूचक इशारा दिला आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरानंतर उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच या मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीच झाली,’ असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावरून उदयनराजे लवकरच भाजपवासी होणार असंच दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी भाजपवर अनेकदा टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष्य केले होते. परंतु, आता तेच उदयनराजे भाजपचे गोडवे गात असल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक समर्थकांना उदयनराजे यांनी धरलेली भाजपची वाट रुचलेली नाही. उदयनराजे यांच्या फेसबुक पेजवरच अनेक समर्थक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

उदयनराजे यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. त्यांच्या फोटवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. परंतु, सध्या त्यांच्या पेजवर टाकलेल्या पोस्टवर देखील राजे आपण भाजपमध्ये जावू नका, अशी विनवणी करण्यात येत आहे. त्यांच्या एका पोस्टवर सर्वाधिक कमेंट भाजपात जावू नका अशाच आहेत. तर बोटावर मोजण्याईतपत समर्थक राजेंच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने उदयनराजे यांचा पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. शिवसेनेकडून उदयनराजे यांच्याविरोधात नरेंद्र पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परंतु, उदयनराजे यांनी अपेक्षेप्रमाणे शानदार विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आले होते. परंतु, आता उदयनराजेच भाजपच्या वाटेवर असल्यामुळे राष्ट्रवादीची लोकसभेची आणखी एक जागा कमी होण्याची शक्यता दिसत आहे.

 

Web Title: BJP people want Udayan Rajan; Don't think supporters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.