शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Nilesh Rane : "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 11:26 IST

BJP Nilesh Rane And NCP Sharad Pawar : डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले असून नेत्यांनी तयार राहवे, अशा सूचनाही दिल्याचे समजते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरही, चर्चा झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत पवारांनी दिले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. 

"पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?" असा खोचक सवाल भाजपानेशरद पवारांना (Sharad Pawar) विचारला आहे. भाजपाचे नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??" असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

शरद पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणाता आता पुन्हा भूकंप होतो की काय, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेतील शिंदे गटाने मोठा बंडाचा पवित्रा घेत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. विशेष म्हणजे सोमवारी या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याच्याशीच मिळते-जुळते विधान ट्विटरवरुन केले होते. 

 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ