शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

...तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीची महापूजा का करावी? आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोध   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:28 PM

यंदाच्या वारीला सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे पंढरपुरात बाहेरील लोक, महाराज मंडळींना प्रवेश नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतून येऊ नयेशरद पवारांवरील टीकेनंतर गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वादात अडकलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आता मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली आहे. दरवर्षी प्रथापरंपरेनुसार आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पुजेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पांडुरंगाची महापूजा करु नये असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाचं संकट आहे, कोरोनामुळे पंढरपुरात बाहेरील लोक, महाराज मंडळींना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का करावी? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतून येऊ नये असं त्यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत यंदाच्या वारीला सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्याचसोबत धनगर समाजाला भाजपा सरकारने तरतूद केलेले १ हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारनं दिले नाहीत असा आरोपही त्यांनी केला. 

शरद पवारांवरील टीकेनं वादंग आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं ते म्हणाले, त्यामुळे पडळकरांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांना राज्यभरात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील असं फडणवीस म्हणाले. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी जायचं असेल तर त्यांना जाऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्मचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्याचा मान नाही, तर हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पाकची खुमखुमी मिटणार नाही; चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध षडयंत्र?

बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस

जाणून घ्या, १ जुलैपासून बदलणार बँकांचे नियम; माहिती नसेल तर होईल तुमचं आर्थिक नुकसान

हिंदुजा भावांमध्ये 'त्या' एका पत्रावरुन वाद; तब्बल ८३ हजार कोटींच्या संपत्तीचं प्रकरण कोर्टात 

तब्बल ९ वर्ष तपस्या करुन मुस्लीम युवकासह कुटुंबातील ३५ सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा