Coronavirus: बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:20 PM2020-06-24T13:20:19+5:302020-06-24T13:36:37+5:30

उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पतंजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत

Coronavirus: Baba Ramdev Made Corona Medicine Coronil On The License Of Cold Cough Medicine | Coronavirus: बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस

Coronavirus: बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देक्लिनिकल टेस्टमध्ये कोरोनिल या औषधाचे १०० टक्के सकारात्मक परिणाम आल्याचा दावा कोरोनिल औषधानं कोरोना रुग्ण ५ ते १० दिवसांत बरा होईल - आचार्य बाळकृष्णइम्युनिटी बूस्टर आणि सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून परवाना जारी केला होता

हरिद्वार - कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी पतंजली निर्मित कोरोनिल औषध लॉन्च झाल्यानंतर आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मंगळवारी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्णद्वारे लॉन्च केलेल्या कोरोनिल औषधाच्या जाहिरातीवर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने बंदी आणली आहे. त्यानंतर पुन्हा बुधवारी बाबा रामदेव यांच्या पंतजली कोरोनिल औषधाला आणखी एक झटका बसला आहे.

उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्राधिकरणाचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की, बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला कोरोनाचे औषध नव्हे तर इम्युनिटी बूस्टर आणि सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून परवाना जारी केला होता. पतंजलीने कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला असल्याचं मीडियातून समजलं असं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तसेच भारत सरकारच्या निर्देशानुसार कोणीही कोरोनाच्या औषधाच्या नावावर प्रचार-प्रसार करु शकत नाही. आयुष मंत्रालयाकडून वैधता मिळाल्यानंतर असं करण्याची परवानगी आहे. सध्या विभागाकडून पतंजलीला नोटीस जारी करुन उत्तर मागवण्यात आलं आहे. मंगळवारी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी देशातील मीडियासमोर मोठा कार्यक्रम आयोजित करुन कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला. ज्यात बाबा रामदेव यांनी त्यांच्या औषधाची क्लिनिकल चाचणी केल्याचं सांगितलं होतं.

बाबा रामदेव यांनी असा दावा केला होता की, क्लिनिकल टेस्टमध्ये कोरोनिल या औषधाचे १०० टक्के सकारात्मक परिणाम पुढे आले आहेत. कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो असं सांगण्यात आलं होतं. लॉन्च झाल्यापासून पंतजलीचं हे औषध वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. आता कंपनीला सर्दी-खोकला आणि तापावर औषध बनवण्याचं लायसन्स मिळाल्यानंतर त्या लायसन्सवर कोरोना औषध लॉन्च केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले आहे. 

आयुष मंत्रालयाने दिले आहेत जाहिरात न करण्याचे आदेश 
देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा

जाणून घ्या, १ जुलैपासून बदलणार बँकांचे नियम; माहिती नसेल तर होईल तुमचं आर्थिक नुकसान

हिंदुजा भावांमध्ये 'त्या' एका पत्रावरुन वाद; तब्बल ८३ हजार कोटींच्या संपत्तीचं प्रकरण कोर्टात 

तब्बल ९ वर्ष तपस्या करुन मुस्लीम युवकासह कुटुंबातील ३५ सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म 

 

Web Title: Coronavirus: Baba Ramdev Made Corona Medicine Coronil On The License Of Cold Cough Medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.