शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:56 PM

पडळकर जातीचं राजकारण करत असल्याचा शिवसेनेचा आरोप

ठळक मुद्देअहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामनेएक वर्ष होऊनही मुख्यमंत्र्यांना पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ नाही- पडळकर१५ दिवसांत अनावरण करा, अन्यथा...; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंगोली: औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. अहिल्यादेवींचा पुतळा गेल्या वर्षभरापासून अनावरणापासून वंचित आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वेळ नाही. हा अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर पडळकर जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारलाअहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणास होत असलेल्या विलंबाबद्दल गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. 'बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मंदिर समितीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पण हा पुतळा गेल्या वर्षभरापासून लोकार्पणापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,' असं पडळकर यांनी पत्रात लिहिलं आहे.

"उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पावर 30 मिनिटं बोललं पाहिजे"'अहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. किरकोळ श्रेयवादासाठी लोकार्पण वर्षभर थांबवणं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखं आहे. येत्या पंधरा दिवसात या पुतळ्याचं अनावरण करावं. अन्यथा पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर श्रद्धा असणारे भक्त व समस्त समाज बांधवांच्या हस्ते भूषणसिंहराजे होळकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल,' असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

शिवसेनेचं पडळकर यांना प्रत्युत्तरमहान कर्तृत्ववान म्हणून ज्यांनी इतिहास गाजवला, त्या अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारून जनभावनेचा आदर राखला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं, अशी सर्वांची इच्छा आहे. मध्यंतरी कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. मात्र त्यातही पडळकर यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेने त्यांच्यासारखे जातीचे राजकारण कधीही केली नाही. त्यामुळे पडळकर यांनीच आपल्या वागण्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा