BJP Mahila Morcha will protest for the resignation of maharashtra ncp minister Dhananjay Munde rape allegation | धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यव्यापी आंदोलन 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यव्यापी आंदोलन 

ठळक मुद्देभाजपाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीमुंडेंच्या राजीनाम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदने देणार, खापरे यांची माहिती

"सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे," अशी माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी दिली. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केलं आहे.
 
"सामाजिक न्याय या सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे,  याचा विचार करावाच लागणार आहे," असं उमा खापरे म्हणाल्या. "मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार  दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे," असं त्यांनी नमूद केलं.  

"एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती सारखा कायदा आपण करतो. मात्र दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील," असेही खापरे यांनी या पत्रकात नमूद केले आहे.             

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP Mahila Morcha will protest for the resignation of maharashtra ncp minister Dhananjay Munde rape allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.