शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:46 PM

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देराम कदम यांची शिवसेनेवर जोरदार टीकातर, पश्चिम बंगालमध्ये डिपॉझिट वाचवता आलं नसतं - राम कदमशिवसेनेचा पश्चिम बंगालमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021)

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून माहिती दिली. यामध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. ''ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे'', अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

बिहारमध्ये डिपॉझिटही वाचवता आले नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, अशी विचारणा राम कदम यांनी यावेळी केली आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून धडा घेत शिवसेनेने बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला, असा चिमटा राम कदम यांनी काढला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तरी तेथेही डिपॉझिट वाचवू शकले नसते, असा टोला राम कदम यांनी लगावला. 

काय म्हणाले संजय राऊत?

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ram Kadamराम कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी