शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले; निलेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 18:22 IST

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. संजय राठोड यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले, असे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजप नेते निलेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीकाठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे - निलेश राणेमहाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही - निलेश राणे

मुंबई :पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. संजय राठोड यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले, असे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (bjp leader nilesh rane criticized sanjay rathod)

सुमारे १५ दिवसानंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहोरादेवी गडावर सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे चालली. पत्रकार परिषदेची सुरुवातच संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली आणि आपली बाजू मांडली. यावेळी जमलेल्या गर्दीवरून निलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली. 

काय म्हणाले निलेश राणे

''शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे'', असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला. 

संजय राठोड यांनी कृत्याची कबुली द्यावी, समाजाची दिशाभूल करू नये: शांताबाई राठोड

संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय

सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय, सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; प्रवीण दरेकरांची टीका 

चित्रा वाघ यांचीही टीका

आताच्या घडीला बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरले. समाजाला वेठीस धरायचे हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणNilesh Raneनिलेश राणे Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा