shantabai rathod says sanjay rathod should give his confession about pooja chavan | संजय राठोड यांनी कृत्याची कबुली द्यावी, समाजाची दिशाभूल करू नये: शांताबाई राठोड

संजय राठोड यांनी कृत्याची कबुली द्यावी, समाजाची दिशाभूल करू नये: शांताबाई राठोड

ठळक मुद्देवनमंत्री संजय राठोड यांचे पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शनसंजय राठोड यांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी - शांताबाई राठोड१५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?; प्रवीण दरेकरांचा सवाल

बीड :पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले आहेत. पोहरादेवी गडावर याठिकाणी संजय राठोड दर्शन घेणार आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. पोहरादेवी गडावर समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. अशातच संजय राठोड यांनी खोटे बोलून समाजाची दिशाभूल करू नये.  पोहरादेवी गडावर आपल्या कृत्याची कबुली द्यावी, असे शांताबाई राठोड यांनी म्हटले आहे. (shantabai rathod says sanjay rathod should give his confession about pooja chavan)

शांताबाई राठोड या पूजा चव्हाण हिच्या चुलत आजी असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शांताबाई राठोड यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय राठोड यांनी आपल्या कृत्याची कबुली पोहरादेवी गडावर जाऊन द्यावी. त्यांनी खोटे बोलून बंजारा समाजाची दिशाभूल करू नये, असे सांगत परळी शहरातील गेल्या पंधरा दिवसातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावेत, अशी मागणीही शांताबाई यांनी यावेळी केली. 

ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये: चंद्रकांत पाटील

संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप

पूजा चव्हाण हिचा गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा गंभीर दावाही शांताबाई राठोड यांनी यापूर्वी केला होता. अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

१५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?

गेले पंधरा दिवस वनमंत्री संजय राठोड काय करत होते? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मंत्र्यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी होती. कॅबिनेट बैठकीला महत्त्वाचा मंत्री गैरहजर राहतो, यवतमाळमध्ये कोरोनाचा कहर असतानाही पालकमंत्री गायब होते. मग मागील १५ दिवस मंत्री संजय राठोड नियोजन करत होते का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) त्यांनी उपस्थित केला आहेत.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा यासंदर्भात निवेदन दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shantabai rathod says sanjay rathod should give his confession about pooja chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.