"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:18 AM2021-09-24T07:18:05+5:302021-09-24T07:19:26+5:30

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

BJP leader Chitra Wagh attack on Shiv Sena MP Sanjay Raut over Dombivli Gangrape case | "शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

"शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की..."; चित्रा वाघ भडकल्या

Next

डोंबिवली (ठाणे) : शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे सरकारचे की, विरोधकांचे, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीका केली. वाघ यांनी पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वाढले असून, राजकारण बाजूला ठेवून चर्चा करण्यास विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. त्याचे समर्थन देण्याऐवजी सरकारमधले जबाबदार नेते विरोधी पक्षावर टिपणी करून वेळ मारून नेत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असताना आणखी किती मुलींचे, महिलांचे लचके तोडले जाणार आहेत, डोंबिवलीच्या घटनेत ३० जणांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित का नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

आतापर्यंतच्या घटना -
-  एप्रिल-२०१३ - डोंबिवलीतील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
-  मे २०१४ - विधवा महिलेस कल्याणमध्ये घरात डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार
-  सप्टें. २०१४ - कल्याण रेल्वे यार्डात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार
-  फेब्रु. २०१६ - कल्याणमधील वाडेघर परिसरात मुलीवर सामूहिक बलात्कार
-  डिसें. २०१८ - डोंबिवलीत तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाचे लिंग कापल्याची घटना, तरुणाचा मृत्यू
-  ऑगस्ट २०१९ - भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
-  फेब्रु. २०२० - डोंबिवलीत १४ वर्षांच्या मुलीवर वॉचमनचा बलात्कार
-  जुलै २०२१ - कल्याणच्या रेल्वे यार्डात एका मूकबधिर मुलीवर बलात्कार
-  फेब्रु. २०२१ - डोंबिवलीत जीम ट्रेनरकडून तरुणीवर बलात्कार
-  मे २०२१ - डोंबिवलीत मामाचा नऊ वर्षीय भाचीवर बलात्कार
-  सप्टें. २०२१ - १४ वर्षीय मुलीवर उल्हासनगर स्कायवॉकवर बलात्कार
 

Web Title: BJP leader Chitra Wagh attack on Shiv Sena MP Sanjay Raut over Dombivli Gangrape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app