शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जयंतरावांनी आमची काळजी करायचं कारण नाही, फुकटातलं मिळालंय ते जरा हजम करा, चंद्रकांत पाटलांचा टोला

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 12, 2020 6:54 PM

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, चंद्रकांत पाटलांनी जबरदस्त बॅटिंग केली...

पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. "आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतच आहोत. त्यामुळे जयंतरावांनी आमची काळजी करण्याचं कारण नाही. फुकटातलं मिळालंय ते जरा व्यवस्थित हजम करून घ्या. आमची चिंता करू नका. फुकटातं मिळालेलं अधिकाधिक दिवस कसं राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या," असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पश्चिम महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

तत्पूर्वी, पुढील चार वर्षं आम्हीच सत्तेवर राहणार. आमदारांनी पक्ष सोडू नये, म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार लवकरच पडणार असल्याचे बोलावे लागत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंना दिल्लीत पाठवू - बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, त्यांना सल्ला द्यायला दिल्लीत पाठवू या. येथे बोलून काय फायदा? त्यांना आता अमेरिकेतही पाठवायचे आहे. मी तिकिटाची व्यवस्था करतो. असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

ठाकरे सरकार महाराष्ट्राचं काय करणार हे कळत नाही. हे सरकार पार गोंधळलेलं आहे. सार्थी रद्द केली, अण्णासाहेब पाटीर महामंडळ बरखास्त केले, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि महिला अत्याचारांसह विविध मुद्द्यांवर हे सरकार गोंधळलेले आहे. या सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, असा टोलाही पाटील यांनी यावेळी ठाकरे सरकारला लगावला.

यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही भाष्य केले. प्रत्येक निवडणुकीत चॅलेंज असतेच. मात्र, तरीही ही निवडणूक सहज जिंकू, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे