शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण...; भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 08:48 IST

राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance)

नाशिक - सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी थेट भाष्य केले आहे. “राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही ते म्हणाले. (BJP leader Chandrakant patil on BJP MNS alliance in future)

रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण'ते' भाजपसोबत येतील असे वाटत नाही -शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्यानासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रवादी नव्हे, अन्यायाविरोधात आक्रमक - ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात भाष्य करताना पाटील म्हणाले, “ईडी ही एक केंद्रिय स्वायत्त संस्था आहे. यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नाही. ”

पंकजा मुंडे नाराज नाहीत त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत - पंकजा मुंडेंसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, केवळ पंकजा यांच्या कारखान्यासंदर्भातच कारवाई केली नाही. इतरही अनेक कारखान्यांवर कारवाई झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते स्वाभाविक आहे. पण पंकजा यांनी त्यांना समजावले आहे. मात्र, याचा आणि त्यांच्या कारखान्याला आलेल्या नोटिशीचा काहीही संबंध नाही. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकElectionनिवडणूक