शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 12:38 PM

भाजप नेत्याचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल 

शिवसेनेत झालेल्या बंडाळीत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. आमदार सर्वप्रथम गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले. या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर, राज्यातही सत्तातर घडून आले. त्यानंतर, विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत त्यांना लक्ष्य केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हायरल झाला होता. आता, या रॅपरला अटक करण्यात आली आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता भाजप आमदारनं त्यांच्यावर निशाणा साधलाय.अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...

“संताप हा विकार आहे आणि रोहित पवारांनी त्यावर विजय मिळवला आहे. त्यांना तो त्यांच्या सोयीने व इच्छेने कधी कधी येतो. केतकी चितळेच्या वेळी आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला,” असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला.

कायम्हणालेरोहितपवार?  “आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलंय. 

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरKetaki Chitaleकेतकी चितळेRohit Pawarरोहित पवार