शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’, नितेश राणेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:09 IST

Nitesh Rane News: मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे म्हणाले. 

एकीकडे देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावासाठी भाजपाच्या काही नेत्यांना जबाबदार धरलं जात असतानाच यंदाच्या रमजान ईदच्या निमित्तानं भाजपाने ३२ लाख मुस्लिम समाजाशी जवळीक साधण्यासाठी खास भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. त्याला ‘सौगात ए मोदी’ असं नावही देण्यात आलं आहे. भाजपानं उचललेल्या या पावलाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या, भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे म्हणाले.

आज विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाची बाजू घेणं म्हणजे लोकांची माथी भडकवणं हे कायद्याच्या कोणत्या चौकटीत आहे, हे मला कळत नाही. मुळात आपल्या देशामध्ये जिथे ८० टक्के हिंदू समाज राहतो. त्याचा हिंदू समाजाला सणवार साजरे करू दिले जात नसतील, त्यांच्या सणांवेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असतील, लँड जिहाद, लव्ह जिहादचं समर्थन संबंधित तक्रारदार करतात का, यांचं उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हानही नितेश राणे यांनी यावेळी विरोधात तक्रार करणाऱ्यांना दिलं.

यावेळी सरसकट मुस्लिमांना विरोध नसल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, भारतात राहून जे तिरंग्याला मानतात. आमच्यासोबत वंदे मातरम् म्हणतात. आमच्या देशात राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात. पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात. आमच्या मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांचा विरोध करतात, ते आमचे मुसलमान आहेत. त्यांच्यासाठी सौगात ए मोदी सारख्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, असं नितेश राणे म्हणाले.

मी पहिल्यादिवसापासून सांगतोय की, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविरोधात आम्ही आधीही नव्हतो आणि आजही नाही. पण आपल्या देशात राहून पाकिस्तान झिंदाबाद म्हणायचं हे कुणाला मान्य आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी विचारला.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाHindutvaहिंदुत्वIslamइस्लाम