शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत

By यदू जोशी | Updated: September 10, 2024 08:25 IST

आपण सोबतच राहणार! अमित शाह यांनी अजित पवार यांना केले आश्वस्त

यदू जोशी

मुंबई - तुम्ही आमच्या सोबत आहात आणि विधानसभेला सोबतच राहणार आहात, महायुतीत ज्या मुद्द्यांवर एकमत होणार नाही ते माझ्याकडे आणा, मी उपाय करेन, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वस्त केले. दुसरीकडे भाजपच्या किमान ५० उमेदवारांना कामाला लागण्याचे निरोप येत्या १५ दिवसांत व्यक्तिश: दिले जातील. नवरात्र उत्सव सुरू होताच, म्हणजे ३ ऑक्टोबरनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. शाह व भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. 

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात दोन महत्त्वाच्या बैठकी झाल्या. सह्याद्री अतिथीगृहावर शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह राज्यातील नऊ प्रमुख भाजप नेत्यांची बैठक रविवारी रात्री घेतली. 

अजित पवार गटाच्या फक्त तीन नेत्यांशी शाह यांनी केली चर्चा 

अमित शाह यांनी विमानतळावर केवळ अजित पवार गटाच्या तीन नेत्यांशी निवडणुकीबाबत चर्चा केली. अजित पवार हे दोन दिवसांच्या शाह यांच्या दौऱ्यात कुठेही नव्हते. ते महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेच्या दोन मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवार गट महायुतीत राहणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच शाह यांनी विमानतळावरील बैठकीत त्यांना ‘हम साथ साथ हैं, और रहेंगे’, असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे. या बाबत प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एकसंधपणे तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा पुनरुच्चार शाह यांनी बैठकीत केला. त्यामुळे इतर कोणत्याही चर्चांना काहीही अर्थ नाही.   असेही कळते की, जागावाटपाची चर्चा लवकर संपून फॉर्म्युला ठरवावा, अशी विनंती अजित पवार यांनी शाह यांना केली. येत्या दहा-बारा दिवसांत चित्र स्पष्ट होईल.   

भाजपच्या बैठकीत काय झाले? ज्या जागांवर वाद होऊ शकतो अशा बाजूला ठेवा. भाजप हमखास ज्या जागा लढणार असे वाटते, त्यांची यादी तयार करून त्यातील किमान ५० टक्के उमेदवारांना तयारीला लागायला सांगा. जेणेकरून त्यांना पुरेसा वेळ मिळेल, अशी भावना एका भाजप नेत्याने सह्याद्रीवरील बैठकीत व्यक्त केली. मात्र, तसे केले तर बंडखोरीची शक्यता आहे, म्हणून कुठेही चर्चा न करता थेट उमेदवारांनाच निरोप द्यायचा, अशी भूमिका ठरल्याचे समजते. 

भाजपचे सध्या १०२ आमदार आहेत. एखाददुसरा अपवाद वगळता ‘सिटिंग-गेटिंग’ या फाॅर्म्युल्यानुसार भाजपलाच या जागा मिळतील. ज्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे अशांना आणि गेल्यावेळी अपयश आले, पण यावेळी भाजपच लढणार याची खात्री असलेल्या जागांवरील उमेदवार लवकर ठरवून त्यांना तसे कळविले जाईल. पहिल्या यादीत ५० नावे असतील, असे मानले जाते.

टॅग्स :BJPभाजपाMahayutiमहायुतीAmit Shahअमित शाहmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४