BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:28 IST2025-05-13T16:24:30+5:302025-05-13T16:28:27+5:30

BJP District President List: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत.

BJP District President: 58 new district presidents appointed in 6 divisions; BJP gave opportunity to new faces, read the list | BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी

BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून, अनेक नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या आगामी रणनीतीचा भाग म्हणून या बदलांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी आता अतुल भोसले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा बदल साताऱ्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. धीरज घाटे यांचे नाव कायम ठेवण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यपद्धतीवर पक्षाचे समाधान असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, मावळमध्ये प्रदीप कंद यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून, त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मावळमधील भाजपची पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या संघटनात्मक बदलांमुळे भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी
प्रभाकर सावंत - सिंधुदुर्ग
सतिष मोरे - रत्नागिरी उत्तर
राजेश सावंत - रत्नागिरी दक्षिण
अविनाश कोळी - रायगड उत्तर
धैर्यशील पाटील - रायगड दक्षिण
संदिप लेले - ठाणे शहर
जितेंद्र डाकी - ठाणे ग्रामीण
रविकांत सावंत - भिवंडी
दिलीप जैन - मिरा भाईंदर
राजेश पाटील - नवी मुंबई
नंदु परब - कल्याण
राजेश वधारिया - उल्हासनगर
धिरज घाटे - पुणे शहर
प्रदिप कंद - पुणे उत्तर (मावळ)
शत्रुघ्न काटे - पिंपरी चिंचवड शहर
रोहिणी तडवळकर - सोलापूर शहर
शशिकांत चव्हाण - सोलापूर पूर्व
चेतनसिंग केदार - सोलापूर पश्चिम
अतुल भोसले - सातारा
राजवर्धन निंबाळकर - कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)
नाथाजी पाटील - कोल्हापूर पश्चिम (करवीर)
प्रकाश ढंग - सांगली शहर
सम्राट महाडिक - सांगली ग्रामीण
निलेश माळी - नंदुरबार
गजेंद्र अंपाळकर - धुळे शहर
बापु खलाने - धुळे ग्रामीण
निलेश कचवे - मालेगांव
दिपक सुर्यवंशी - जळगांव शहर
चंद्रकांत बाविस्कर - जळगावं पूर्व
राध्येश्याम चौधरी - जळगावं पश्चिम
नितीन दिनकर - अहिल्यानगर उत्तर
दिलीप भालसिंग - अहिल्यानगर दक्षिण
अमर राजूरकर - नांदेड महानगर
शिवाजी भरोसे - परभणी महानगर
गजानन घुगे - हिंगोली
भास्करराव मुकुंदराव दानवे - जालना महानगर
नारायण कुचे - जालना ग्रामीण
सुभाष शिरसाठ - छत्रपती संभाजीनगर उत्तर
संजय खंबायते - छत्रपती संभाजीनगर पश्चिम
दत्ता कुलकर्णी - धाराशिव
विजयराज शिंदे - बुलढाणा
सचिन देशमुख - खामगांव
जयवंतराव मसणे - अकोला महानगर
संतोष शिवरकर - अकोला ग्रामीण
पुरुषोत्तम चितलांगे - वाशिम
डॉ. नितीन धांडे - अमरावती शहर
रविराज देशमुख - अमरावती ग्रामीण (मोरणी)
प्रफुल्ल चव्हाण - यवतमाळ
डॉ. आरती फुफाटे - पुसद
प्रभुदास भिलावेकर - मेळघाट
दयाशंकर तिवारी - नागपूर महानगर
अनंतराव राऊत - नागपूर ग्रामीण (रामटेक)
मनोहर कुंभारे - नागपूर ग्रामीण (काटोल)
आशु गोंडाने - भंडारा
सिता रहांगडाले - गोंदिया
दिपक बाळा तावडे - उत्तर मुंबई
दिपक दळवी - उत्तर पूर्व मुंबई
विरेंद्र म्हात्रे - उत्तर मध्य मुंबई
 

Web Title: BJP District President: 58 new district presidents appointed in 6 divisions; BJP gave opportunity to new faces, read the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.