"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:30 IST2025-06-12T12:11:54+5:302025-06-12T12:30:18+5:30
BJP Chitra Wagh And Congress Nana Patole : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत धक्कादायक विधान केलं असून त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्पूटरवरील व्हिडीओ गेम होता" असं म्हटलं आहे. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. "नानांच्या नाना कळा, पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?" असं म्हणत निशाणा साधला आहे.
भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता-भगिनींच्या दु:खाची चेष्टा करत आहात. एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह. काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतंय" असं म्हटलं आहे.
नानांच्या नाना कळा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 12, 2025
पाकिस्तान्यांचा यांना भलताच कळवळा?
एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह
काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतेय…@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RaviDadaChavan#shame_on_you_nanapic.twitter.com/6fIvOnWP3P
"नानांच्या नाना कळा, पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा? ऑपरेशन सिंदूर हा पहलगाममध्ये ज्या ज्या माताचं सिंदूर पुसलं गेलं त्याचा हुंकार होता. आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पणाला लावून, दहशतवादाविरुद्ध उभं राहून, मोठ्या शौर्याने त्यांना घरात घुसून मारलं. त्या शौर्याला तुम्ही लहान मुलांच्या कम्पूटर गेमची उपमा देत आहात. तुमच्या बुद्धीची कीव येत आहे. राजकारणासाठी आणखी किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात. नुकतंच विशेष सर्वपक्षीय मंडळ ३० देशांत जाऊन त्यांनी आपल्या देशाची भुमिका मांडली."
"पाकिस्तानचा खरा चेहरा त्यांनी जगासमोर उघड केला आणि सर्वात महत्त्वाचं दहशतवादाविरोधातील भारताची भुमिका तुमच्या काँग्रेस पक्षातील मान्यवरांनी जगासमोर मांडली. मग त्याला कम्पूटर गेम म्हणून त्याची अवहेलना करणार आहात. नाना, तुमच्यासारखी देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानच फावतं. तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता-भगिनींच्या दु:खाची चेष्टा करत आहात. एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह. काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतंय" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.