शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

MPSC Exam Postponed : "MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक, सरकारमध्ये समन्वय नसल्याने गोंधळाची परिस्थिती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 18:42 IST

BJP Chandrakant Patil Target Thackeray Government : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील "MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक" असल्याचं म्हटलं आहे. 

मुंबई -  येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला. याच दरम्यान भाजपाच्या नेतेमंडळींनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील "MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक" असल्याचं म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे. या सरकारमध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही. त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी २ ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो. त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक आहे. MPSC सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा २ वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी मी मागणी करतो" असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

"फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?", नितेश राणेंचा सणसणीत टोला

भाजपाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी "फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत!!!  फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार... रात्रीच्या पार्टीमध्ये नाही??" असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

"...आपल्याला पुढं जावं लागेल, मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं", रोहित पवारांची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे असं म्हटलं आहे. "यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा चांगलाच फटका बसला. 

"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट 

पुण्यात विद्यार्थ्यांनी एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा यासारखी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीPuneपुणेBJPभाजपा