शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने ‘ती’ जाहिरात गुंडाळली सर्वत्र खिल्ली : सोशल मीडियावर उडाली यथेच्छ टर

By admin | Updated: October 10, 2014 05:14 IST

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे नकारात्मक सूरातील जाहिरात कॅम्पेन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर आली असल्याचे समजते

मुंबई : ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे नकारात्मक सूरातील जाहिरात कॅम्पेन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर आली असल्याचे समजते. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम भाजपामधील विसंवाद उघड झाला. त्या पाठोपाठ पन्नासहून अधिक उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीतून ‘आयात' केल्याने भाजपाचा स्वबळाचा फुगा फुटला. आता भाजपाच्या जाहिरात कॅम्पेनची सोशल मीडियावर यथेच्छ टर उडवली गेल्याने ते गुंडाळण्याचा निर्णय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचाराची धुरा असतानाही भाजपाची प्रचाराची गाडी रुळावरून घसरली आहे.महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था यासारख्या समस्यांवर संतप्त स्वरात बोलून ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असा नकारात्मक सवाल करणारे जाहिरात कॅम्पेन भाजपाने सुरु केले होते. मात्र या कॅम्पेनची टर उडवताना ‘कुठं नेला चार्जर माझा’ यापासून ते ‘कुठं नेला अ‍ॅडमिन माझा' असे संदेश गेले आठवडाभर फिरत होते. भाजपाने लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आयेंगे' असे कॅम्पेन केले होते. लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे जाहिरात कॅम्पेन पियुष पांडे यांनी केले होते. यावेळीही त्यांनाच जाहिरातीची सूत्रे दिली होती. मात्र यावेळी भाजपा सपशेल तोंडावर आपटल्याने दिवसभर सर्वच वाहिन्यांवर भाजपाच्या ‘कुठं नेऊन ठेवला'च्या जाहिराती दाखवण्यात येत नव्हत्या. त्या जाहिराती हा कॅम्पेनचा पहिला टप्पा होता. नवीन जाहिराती लवकर सुरु होतील, असा खुलासा भाजपाने केला. मात्र प्रचाराला अत्यल्प कालावधी असताना जुन्या जाहिराती बंद करून नव्या सुरु झाल्या नाहीत याची चर्चा सुुरु होती. मोदींच्या अमेरिकेतील भाषणाची एकमेव जाहिरात दिवसभर सुरु होती.