शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपाचा मित्रपक्षांना ठेंगा

By admin | Updated: July 29, 2014 03:01 IST

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली खरी, पण मूळ विषयाला बगल देत निवडणूक तयारीचे प्रवचन ऐकवून आणि नुसत्या याद्या घेऊन भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी मित्रपक्षांची बोळवण केली. जागावाटपावर भाजपा-शिवसेना नेत्यांचेच अजून एकमत झालेले नसताना आज रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामच्या नेत्यांसह महायुतीची एकत्रित बैठक झाली. ही बैठक जागावाटपासंदर्भात आहे, असे सर्वांना सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी काय करायला हवे, हेच चऱ्हाट लावले. वास्तविक घटक पक्षांचे नेते आपापल्या याद्या घेऊन आलेले होते. पण त्यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नसल्याचे समजते.सूत्रांनी सांगितले की, रिपाइंला ४०, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २४, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ३० तर शिवसंग्रामला किमान ३० जागा हव्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांकडे जागांची यादी मोठी असल्याचे समजल्याने त्यावर चर्चा टाळण्यात आली. शिवसंग्राम वगळता इतर घटक पक्षांनी आपापल्या याद्या सेना-भाजपा नेत्यांकडे सादर केल्या, पण चर्चाच न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या स्वाभिमानी संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे बैठकीत दिसून आले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना विनायक मेटे म्हणाले, महायुती सत्तेत आली पाहिजे ही आमची भूमिका आहे, त्यासाठी अडवणुकीची भूमिका घेणार नाही. नेमक्या कोणत्या जागा हव्या आहेत त्यांची नावे द्या, असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले. महायुतीतील पक्षांपैकी कोणाला भाजपाच्या चिन्हावर लढायची इच्छा असेल तर आमची हरकत असणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)