शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

Atul Bhatkhalkar : "वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:17 IST

BJP Atul Bhatkhalkar And NCP Sharad Pawar : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यातील नॉन भाजपा सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष देऊन, सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे. हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे असं म्हटलं आहे. तसेच केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१४च्या निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा केली होती. पण अच्छे दिनचे चित्र देशातील नागरिकांना आजपर्यंतही जाणवत नाही असं म्हणत भाजपावर निशाणा साधला. यानंतर आता भाजपाने राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे. 

"वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा" असं म्हणत भाजपा नेत्याने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पवार मात्र लवासा, आयपीएल, इफ्तार पार्ट्या, भ्रष्टाचारी-दाऊद टोळीवाल्यांची वकिली अशा लोकोपयोगी कामात सतत गुंतलेले असतात... वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा..." असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.  

शरद पवार यांनी गुजरात, आसाम या दोन राज्यातील सत्ता वगळता त्यांना लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्यामुळे भाजपाने देशातील नॉन बीजेपी सरकार हटवण्यासाठी यंत्रणांचा वापर केला आहे. याप्रमाणेच राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडले असून त्यांच्याशी सुसंगत संवाद नसलेल्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी त्या कारणाखाली अडकूवन तुरूंगात टाकले. यासाठी त्यांनी अनिल देशमुख यांच्या घरांवर, नातेवाईकांवर टाकलेल्या धाडींसह नवाब मलिक, संजय राऊत यांचे उदाहरणेही यावेळी दिले.

देशातील भाजपा सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून त्याविरोधात जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी यांनी काँग्रेस पक्ष सोडला. पण हे चांगले झाले नाही. पार्लमेंटमधील ते माझे चांगले सहकारी आहे. ते भाजपाच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिलेले आहे. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांना काय संकट आले हे  माहित नसल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय राज्यात कोणावर कधी धाड पडणार, कधी जेलमध्ये जाणार हे भाजपच्या काही लोकांना कसे कळते यावरून काही तरी गडबड असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहीत पवारांविषयी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून त्यांनी भाजपात भविष्यवाणी वर्तवणार गट तयार झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस