शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या 'उबाठा'चे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 20:42 IST

Ashish Shelar vs Sanjay Raut: संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात? असाही पोस्टमध्ये केला उल्लेख

Ashish Shelar vs Sanjay Raut: मोदी जिंकले असे म्हणणाऱ्या लोकांनी डोकी तपासून घ्यावीत, कारण कुबड्या काढल्या तर सरकार कोसळू शकते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिले. आशिष शेलार यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आणि टीकेचा खरपूस समाचार घेतला.

"श्रीमान मोरारजी राऊत... महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून "हग्रलेख" लिहितात?" अशी खोचक टीका शेलारांनी केली.

"आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील. मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळ्यांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले. त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना? वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय ? चोर तर चोर वरुन शिरजोर?" असे खरमरीत सवाल शेलारांनी राऊतांना विचारले.

"मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का? दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना "आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं" ...म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात!" अशी बोचरी टीका शेलारांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAshish Shelarआशीष शेलारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे