शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Ashish Shelar : "...आता भोगा आपल्या कर्माची फळं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 10:29 IST

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, अजित पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याच्या सुरू झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. याच दरम्यान भाजपानेउद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

"हाच स्वभाव नडला आणि  कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात...पसरवणारे एकच ते महान "विश्वविख्यात". हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप"

"...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं देखीस याआधी आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादा यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अजितदादा आमच्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजी नाही. सरकार आणखी मजबूत झाले आहे. आम्ही नाराज असल्याच्या अफवा विरोधकांकडून करण्यात येत आहेत.तुम्ही तुमच घर बघा, तुमचं घर तर तुटलं आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

'आम्हाला गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे,  महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. जेव्हापासून मी आणि देवेंद्रजी काम करत आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. अफवा पसरवणाऱ्यांची मर्यादा काय आहेत ते बघा, सर्व मर्यादा त्यांनी तोडल्या आहेत. विरोधकांचा जळफळाट होऊन अशा अफवा पसरवत आहेत, असंही शिंदे म्हणाले.   

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण