“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 05:20 PM2021-08-27T17:20:10+5:302021-08-27T17:21:05+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

bjp ashish shelar criticised cm uddhav thackeray in jan ashirwad yatra at ratnagiri | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

Next

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटक आणि जामीन नाट्यानंतर पुन्हा एकदा जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp ashish shelar criticised cm uddhav thackeray in jan ashirwad yatra at ratnagiri)

महाड न्यायालयाने नारायण राणे यांना मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडूनही नारायण राणे यांना दिलासा मिळाला. यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेले भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक 

ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. 

मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुद्धा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झाले, अन्य नावे मी घेत नाही. तर आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. कोकणाला काही मिळाले की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांना मध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

दरम्यान, वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले, म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला, तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केले गेले. महाराष्ट्रात जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, या शब्दांत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.
 

Web Title: bjp ashish shelar criticised cm uddhav thackeray in jan ashirwad yatra at ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.