काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 00:18 IST2025-10-11T00:18:23+5:302025-10-11T00:18:56+5:30
Keshav Upadhye Criticize Harshwardhan Sapkal: ''गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे याच्याशी करून आपल्या बौद्धिक अगोचरपणाचे हीन दर्शन घडवले आहे. हे कसले गांधीवादी?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम याच्याशी केल्याने भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे याच्याशी करून आपल्या बौद्धिक अगोचरपणाचे हीन दर्शन घडवले आहे. हे कसले गांधीवादी?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, तुमच्या पक्षातच एक गोडसे दररोज गांधीवादाची हत्या करतोय आणि तुमच्यासारखे अनेक नवगांधींचे गुलाम त्याची भजने गात गावगन्ना हिंडताय. गांधींजी हत्या करणाऱ्या गोडसेची तुलना करायचीच असेल तर ती गांधी नाव धारण करून देशाची दिशाभूल करणाऱ्या परिवाराशी आणि त्या परिवाराच्या वारसा हक्कातून कॉंग्रेसवर हुकूमत गाजविणाऱ्या राहुल गांधीशीच करावी लागेल, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्रजींची तुलना नथुराम गोडसे यांच्याशी करून आपल्या बौद्धिक अगोचरपणाचे हीन दर्शन घडविले आहे. हे कसले गांधीवादी?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 10, 2025
तुमच्या पक्षातच एक गोडसे दररोज गांधीवादाची हत्या करतोय, आणि तुमच्यासारखे अनेक नवगांधींचे गुलाम त्याची भजने गात…
‘’त्या गोडसेने गांधीजींवर गोळ्या चालवल्या, तुमचे राहुल गांधी रोज संविधानाबाबत तेच करत आहेत. गोडसेने सत्याचा आग्रह धरणाऱ्या गांधीजींना मारले. राहुल गांधी रोज असत्याचा पाठपुरावा करत असतात. गोडसेने अहिंसेचा आग्रह धरण्याऱ्या गांधींना मारले. राहुल गांधी देशातील तरुणांना चिथावणी देणारी भाषा करतातटट, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.