जेलमध्ये पाण्यासोबत खातो बिस्किट, फक्त पहिल्याच दिवशी घेतला चहा; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली आर्यन खानची दिनचर्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:15 PM2021-10-19T18:15:04+5:302021-10-19T18:20:05+5:30

Aryan Khan Drugs Case : आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एका आठवड्यासाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना बॅरेक नंबर 1 मध्ये आणण्यात आले. एका बॅरेकमध्ये 4 सेल आहेत आणि एका सेलमध्ये 100 कैदी असतात. म्हणजेच 4 सेलमध्ये 400 कैदी. सर्व जण येथे शेजारी-शेजारीच झोपतात. हालचाल करायलाही त्रास होतो. एका सेलमध्ये 4 स्वच्छतागृहे आहेत.

Biscuits eaten with water in prison, tea taken only on the first day; Eyewitness reports Aryan Khan's routine! | जेलमध्ये पाण्यासोबत खातो बिस्किट, फक्त पहिल्याच दिवशी घेतला चहा; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली आर्यन खानची दिनचर्या!

जेलमध्ये पाण्यासोबत खातो बिस्किट, फक्त पहिल्याच दिवशी घेतला चहा; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली आर्यन खानची दिनचर्या!

Next

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कारागृहात जेवत नाही. त्याने केवळ पहिल्या दिवशीच कारागृहातील चहा घेतला होता. त्यानंतर त्याने कारागृहातील कुठल्याही खाण्याला स्पर्ष केलेला नाही. आर्यन कारागृहातील अन्न घेत नाही. तो त्याचे अन्न इतर कैद्यांना देतो आणि गप्प-गप्पच असतो, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स केसमध्ये (Mumbai Cruise Drugs Case) आर्यन आर्थर रोड कारागृहात असून 20 ऑक्टोबरला त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. (Routine of Aryans in prison)

यासंदर्भात, दैनिक भास्करने वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्या 16 ऑक्टोबरला कारागृहातून बाहेर आलेला कैदी श्रवण नडारने (Shravan Nadar) आर्यन खानसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्याचे दैनिक भास्करने म्हटले आहे. नडार फसवणुकीच्या प्रकरणात सहा महिने आर्थर रोड कारागृहात होता. तो सोमवारीच कारागृहातून बाहेर आला. विशेष म्हणजे श्रवण नडार हा आर्यन खान ज्या बॅरेकमध्ये आहे, त्याच बॅरेकमध्ये होता. एवढेच नाही, तर आर्यनच्या बॅरेकमध्ये जेवण देण्याची ड्यूटीही श्रवणचीच होती. 

आपलं अन्न इतर कैद्यांना देतो -
श्रवणने सांगितले, आर्यनने पहिल्याच दिवशी जेलचा चहा घेतला. त्याला तो चहा मीच दिला होता. याशिवाय त्याने काहीही खालले नाही. तो कॅन्टीनमधून बिस्किट्स, चिप्स मागवतो. बिस्किट्स पाण्यात बुडवून खातो आणि बाटलीबंद पाणीच घेतो. मी अनेक वेळा पाहिले आहे. श्रवण म्हणाला, कारागृहाच्या नियमांप्रमाणे, आपल्या वाट्याचे अन्न घ्यावेच लागते. आर्यन त्याच्या वाटाच्या अन्न घेतो, पण तो ते इतर कैद्यांना देऊन टाकतो. मी आणि कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याला विचारले, पण तो केवळ, इच्छा नाही, भूक नाही, असे म्हणतो. तो एकटाच असतो. कुणाहीशी बोलत नाही. 

एका बॅरेकमध्ये 4 सेल, प्रत्येक सेलमध्ये 4 टॉयलेट अन् 100 लोक - 
श्रवणने सांगितले, आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एका आठवड्यासाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना बॅरेक नंबर 1 मध्ये आणण्यात आले. एका बॅरेकमध्ये 4 सेल आहेत आणि एका सेलमध्ये 100 कैदी असतात. म्हणजेच 4 सेलमध्ये 400 कैदी. सर्व जण येथे शेजारी-शेजारीच झोपतात. हालचाल करायलाही त्रास होतो. एका सेलमध्ये 4 स्वच्छतागृहे आहेत. यात एक पाश्चिमात्य तर 3 भारतीय प्रकारचे आहेत. आर्यनच्या कोठडीत 100 कैदी आणि 10 पंखे आहेत.

घरून आलेली पँट-टी-शर्टच घालतो -
आर्यन कारागृहात घरून आलेला टी-शर्ट आणि जीन्स परिधान करतो. त्याला कुठल्याही प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत नाही. मी परवा येत असताना, तो मनीऑर्डरने आलेल्या 4500 रुपयांतून चिप्स आणि पाण्याच्या 5 डझन बाटल्या विकत घेत होता. मी आर्यनशी बोललो, तेव्हा तो फक्त म्हणाला, तुमचे अभिनंदन, तुम्ही बाहेर जात आहात. यावर मी म्हणालो, तूही लवकरच येशील, देवावर विश्वास ठेव, असे श्रवणने सांगितले.

अशी आहे आर्यन खानची दिनचर्या -
श्रवणने दैनिक भास्कशी बोलताना कारागृहातील आर्यनच्या दिनचर्येसंदर्भातही सांगितले. श्रवण म्हणाला, कारागृहात आल्यानंतर आर्यन बराच घाबरलेला होता. तेथे आल्यानंतर त्याची कटिंग आणि दाढी करण्यात आली. तो तेथे टीव्हीही पाहत नाही आणि कुणाशी बोलतही नाही. कारागृहात सकाळी 6 वाजता शिट्टी वाजते. कैदी मोजले जातात. यानंतर आर्यन हात-पाय-तोंड दुतो आणि नाश्ता घेतो. नाश्त्यात शिरा, पोहे आणि चहा असतो. आर्यन त्याचा नाश्ता दुसऱ्या कैद्याला देतो.

जेवणात 2 पोळ्या, वरण आणि भाजी - 
कारागृहात सकाली 10 वाजता भोजन मिळते. यात 2 पोळ्या, वरण आणि भाज्या असतात. आर्यन तेही दुसऱ्यालाच देतो. यानंतर तो विश्रांतीसाठी जातो. दुपारी 3 वाजता चहा दिला जातो, संध्याकाळी 5.30 वाजता जेवण दिले जाते. 6 वाजता पुन्हा सर्व कैदी मोजले जातात. यानंतर सर्वजण आपापल्या बॅरेकमध्ये परततो. 

Web Title: Biscuits eaten with water in prison, tea taken only on the first day; Eyewitness reports Aryan Khan's routine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.