केवळ आधारकार्डवर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले होणार रद्द; महसूल मंत्र्यांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:59 IST2025-11-28T09:57:17+5:302025-11-28T09:59:06+5:30

बोगस कार्डांविरुद्ध मोहीम, ११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Birth and death certificates issued only on Aadhaar card will be cancelled; Revenue Minister orders | केवळ आधारकार्डवर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले होणार रद्द; महसूल मंत्र्यांनी दिले आदेश

केवळ आधारकार्डवर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले होणार रद्द; महसूल मंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई -  केवळ आधारकार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. 

महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

...तर गुन्हा दाखल होणार
अर्जातील माहिती आणि आधारकार्डवरील जन्मतारखेमध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर  गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत, त्यांची यादी बनवून त्यांना ‘फरार’ घोषित करुन त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जाईल. 

ही शहरे रडारवर
अवैध जन्म-मृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके ‘हॉटस्पॉट’ असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये अमरावती, सिल्लोड, अकोला, संभाजीनगर शहर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश आहे.

आधारकार्ड हा जन्माचा पुरावा ग्राह्य नाही : तसेच, ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधारकार्डला पुरावा मानून जन्म-मृत्यू दाखले दिले गेले आहेत, ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील. आधारकार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामाचा निपटारा केला जाईल. 

प्रमाणपत्रे परत घेणार,  फेरतपासणी करणार  
जन्म-मृत्यूचे दाखले देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे. मात्र एक वर्षे उलटून गेल्यावर हे दाखले महसूल विभागामार्फत दिले जातात. त्यासाठी तहसीलदार व त्यावरील अधिकारी सक्षम आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बरेच गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. आता प्रमाणपत्र परत घेणे किंवा त्यांची फेरतपासणी करण्याचे निश्चित केले आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

 

Web Title : आधार से बने जन्म-मृत्यु प्रमाणपत्र रद्द: राजस्व मंत्री का आदेश

Web Summary : महाराष्ट्र में धोखाधड़ी के चलते आधार से बने जन्म/मृत्यु प्रमाणपत्र रद्द। राजस्व मंत्री ने संदिग्ध प्रमाणपत्र रद्द करने और पुलिस में शिकायत दर्ज करने का आदेश दिया। विशेष अभियान के जरिए त्रुटिपूर्ण रिकॉर्ड सुधारे जाएंगे, हॉटस्पॉट शहरों पर ध्यान केंद्रित किया जाएगा। झूठी जानकारी पर आपराधिक आरोप; प्रमाणपत्र वापस न करने वालों को भगोड़ा घोषित किया जाएगा।

Web Title : Aadhaar-Based Birth, Death Certificates to be Cancelled: Revenue Minister Order

Web Summary : Maharashtra cancels Aadhaar-only birth/death certificates due to fraud concerns. Revenue Minister orders immediate cancellation of suspicious certificates, police complaints. Special drives will rectify flawed records, focusing on hotspot cities. False information leads to criminal charges; beneficiaries failing to return certificates will be declared absconders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.