शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

बिहार पॅटर्न राज्यात तूर्त नाही! मतदार याद्यांबाबतची राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:25 IST

 बिहारमधील विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमावरून वादळ निर्माण झाले होते. विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतले.

मुंबई : बिहारच्या धर्तीवर विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राबविला जाण्याची शक्यता नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत केलेली विनंती मान्य केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

 बिहारमधील विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमावरून वादळ निर्माण झाले होते. विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतले. तरीही त्याची चिंता न करता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम राबविला.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा कार्यक्रम केंद्रीय आयोगाकडून हाती घेतला जाईल, अशी चर्चा असतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सप्टेंबरमध्ये एक पत्र लिहिले. असा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राबवू नये अशी विनंती पत्रात करण्यात आली होती. 

कार्यकक्षाही भिन्न दोन्ही आयोग वेगवेगळे आहेत आणि दोघांच्या कार्यकक्षाही भिन्न आहेत. मात्र, दोघांकडूनही कामांसाठी महसूलसह राज्य सरकारची जी यंत्रणा वापरली जाते ती सारखीच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना पुनरीक्षण हाती घेतले तर यंत्रणांना ते शक्य होणार नाही, अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतली. सूत्रांनी स्पष्ट केले, बिहारव्यतिरिक्त कोणत्याही राज्यासाठी असे विशेष पुनरीक्षण केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेले नाही वा नजीकच्या भविष्यात ते घेण्याबद्दल सूतोवाचही केलेले नाही.

हरकतींसाठी मुदतवाढ राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत  राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर १३ ऑक्टोबरऐवजी १७ पर्यंत हरकती घेता येतील.  प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आज चर्चाराज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना येथील मुख्यालयात मंगळवारी आमंत्रित केले आहे. निवडणुकीसाठी आयोगाने कोणती तयारी केली आहे, याची माहिती आयोगाकडून प्रतिनिधींना दिली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Pattern Unlikely in Maharashtra; State Election Body Request Approved

Web Summary : Maharashtra unlikely to replicate Bihar's voter list revision before local elections. State Election Commission's request to Central Election Commission will be accepted. Differing jurisdictions and strain on state machinery cited. Deadline extended for voter list objections.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग